नाशिक। दि. २३ जानेवारी २०२६: चौथा शनिवार, रविवारची सुटी, सोमवारी प्रजासत्ताक दिनाची सार्वजनिक सुटी आणि मंगळवारी (दि. २७) ऑल इंडिया एम्प्लॉइज युनियनचे देशव्यापी आंदोलन यामुळे सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत.
त्यामुळे ग्राहकांना आपले बँकेचे व्यवहार आजच करणे करणे फायद्याचे राहील. सलग चार दिवस बँका बंद राहिल्याचा परिणाम एटीएममध्ये कॅशचा तुटवडा निर्माण करू शकतो. मात्र, या दरम्यान ऑनलाइन सेवा सुरू राहणार आहेत.
पाच दिवसांचा आठवडा करण्यात यावा, राष्ट्रीयीकृत बँकांमधून मोठ्या प्रमाणावर कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर नोकरभरती नाही, या गोष्टींचा ताण कर्मचाऱ्यांवर येतो आहे. ग्राहकांना गुणवत्तापूर्वक सेवा मिळण्यासाठी पुरेशा कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी प्रमुख मागणी ऑल इंडिया एम्प्लॉइज युनियनचने केली आहे. या मागण्यांसंदर्भात मंगळवारी ‘बँक बंद’चा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना आजच व्यवहार करावे लागतीतल.
मंगळवारी बँका का बंद राहणार?:
खरे तर २७ जानेवारी (मंगळवार) रोजी अधिकृत सुट्टी नाही, तरीही त्या दिवशी बँकांचे कामकाज होणार नाही. याचे मुख्य कारण म्हणजे बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेला देशव्यापी संप. बँकिंग क्षेत्रात ‘पाच दिवसांचा कार्य आठवडा’ लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारने दिरंगाई केल्याचा आरोप करत युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने संपाचे हत्यार उपसले आहे.
![]()


