
नाशिक। दि. १९ जून २०२६: “अवयवदान हेच जीवनदान” या संदेशाला साजेशी प्रेरणादायी कृती चांदवड येथील एका कुटुंबाने करून दाखवली आहे. चांदवड (जि. नाशिक) येथील श्री. खंडू काशिनाथ आहेर (वय ५४) यांच्यावर नाशिक येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. विशेष बाब म्हणजे त्यांच्या पत्नी सौ. सुनीता खंडू आहेर यांनी स्वतःची किडनी दान करून पतीला नवजीवन दिले.
श्री. आहेर हे बऱ्याच वर्षांपासून किडनीच्या आजाराने ग्रस्त होते व डायलेसिस सपोर्ट सिस्टीम वर होते रुग्णाच्या वैद्यकीय स्थितीचे सखोल मूल्यांकन केल्यानंतर उपचारांचे नियोजन करण्यात आले. प्रथम खराब झालेली किडनी कोणतीही गुंतागुंत न होता यशस्वीपणे काढण्यात आली. रुग्णाला किडनी जुळणाऱ्या किडनीदात्यांचा शोध घेतांना बऱ्याच अडचणी सामोऱ्या आल्या नात्यात अनेक दाते तयार असतांना किडनी जुळण्यात अडचणी आल्या सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीनंतर सौ आहेर म्हणजेच रुग्णाची पत्नी यांची किडनी जुळून आली व त्यांनी पतीच्या जीवनाकरिता किडनी दान करीत प्रत्यारोपणाचा निर्णय घेण्यात आला व किडनी प्रत्यारोपणाची प्रक्रिया पार पाडण्यात आली. संपूर्ण उपचार प्रक्रिया अत्यंत यशस्वीरीत्या व कोणत्याही गंभीर गुंतागुंतीशिवाय पूर्ण करण्यात आली.
ही जटिल प्रत्यारोपण शस्त्रक्रिया किडनी विकार व प्रत्यारोपण तज्ञ डॉ प्रकाश उगले व प्रत्यारोपण सर्जन डॉ. प्रवीण गोवर्धने, डॉ. किशोर वाणी आणि डॉ. अभयसिंह वालिया यांच्या नेतृत्वाखालील अनुभवी वैद्यकीय पथकाने यशस्वीपणे पार पाडली. तसेच संपूर्ण उपचार प्रक्रियेदरम्यान डॉ. प्रकाश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेषज्ञ डॉक्टर, परिचारिका आणि सहाय्यक कर्मचारी व आधुनिक तंत्रज्ञान यांच्या समन्वयाने प्रक्रिया विना अडथळा पार पडली.
शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून नवीन किडनीचे कार्य समाधानकारकपणे सुरू असल्याची माहिती वैद्यकीय पथकाने दिली. रुग्ण उपचारांना उत्तम प्रतिसाद देत असून त्यांच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत आहे.
या यशस्वी किडनी प्रत्यारोपणामुळे अवयवदानाविषयी समाजात सकारात्मक जनजागृती होण्यास मदत व्हावी व अवयवदानातून नवजीवन मिळू शकते, हा संदेश या घटनेतून अधोरेखित झाला असून अधिकाधिक नागरिकांनी अवयवदानाबाबत जागरूक होऊन पुढाकार घ्यावा, असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.
यावेळी बोलतांना हॉस्पिटल हॉस्पिटल सिओओ श्री दिप्तेन्दू पांडा यांनी अवयवदानातून किडनीच्या आजाराच्या रुग्णांना प्रत्यारोपणाच्या माध्यमातून पूर्ण निरामय जीवन शक्य असून सामाजिक अवयव दानाविषयी जनजगृती आवश्यक आहे.
तसेच अपोलो हॉस्पिटल, नाशिक येथे आतापर्यंत उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक २०० हून अधिक यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, अनुभवी प्रत्यारोपण तज्ज्ञ आणि सक्षम सपोर्टिव्ह केअर टीमच्या माध्यमातून किडनी विकारग्रस्त रुग्णांना नवसंजीवनी देण्याचे कार्य रुग्णालय सातत्याने करत आहे. असे सांगितले
यावेळी यशस्वी किडनी प्रत्यारोपणानंतर श्री. खंडू काशिनाथ आहेर त्यांच्या पत्नी व किडनीदात्या सौ. सुनीता खंडू आहेर. डॉ. प्रकाश उगले, किडनी प्रत्यारोपण व भूलतज्ञांचे वैद्यकीय पथक, सौ. चारुशीला जाधव आणि श्री. आकाश शेवाळे उपस्थित होते.
![]()


