नाशिक: केटीएचएम कॉलेजसमोर झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू

नाशिक: केटीएचएम कॉलेजसमोर झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या केटीएचएम कॉलेजसमोर बुधवारी रात्री अपघात झाला.

या अपघातात 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.

रात्री घरी जात असताना अचानक गाडी स्लिप झाल्यानं हा अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

हे ही वाचा:  नाशिक: नवनवीन गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पोलीसांची भूमिका आव्हानात्मक- न्यायाधिश जगमलानी

आदर्श श्रीनिवास दास हा नाशिकच्या इंदिरानगरमध्ये मित्रांसोबत राहत होता. नाशिकमध्ये तो एका पान टपरीवर काम करत होता. बुधवारी मध्यरात्री (27 जानेवारी) तो घरी जात होता. रात्री दीड वाजेच्या सुमारास जुन्या गंगापूर नाक्याकडून अशोक स्तंभाकडे आपल्या स्वतःच्या मोटरसायकलने (एम एच 15 एक जी 9625) जात असताना गंगापूर रोडवरील केटीएचएम महाविद्यालया समोरील डिव्हायडर वर स्वतः धडक दिल्याने त्याच अपघात झाला.

हे ही वाचा:  नाशिक: सातपूर MIDCमध्ये कंपनीत भीषण आग; अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”9829,9841,9843″]

यात तो खाली पडल्याने त्याच्या डोक्यास, दोन्ही गुडघ्याला आणि पायाला दुखापत झाल्याने त्यास उपचाराकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डोक्याला जबर दुखापत झाल्याने आदर्श यास डॉक्टरांनी मृत घोषित केले.

हे ही वाचा:  नाशिक: शेअर्स ट्रेडिंगचे आमिष दाखवून लिंक पाठवत ३९ लाखांना गंडा

आदर्श हा बेंगलोर येथे राहणारा आहे. त्याच्या पश्चात त्याची आई आणि वडील आहेत ते सध्या बेंगलोर च्या त्याच्या घरी आहेत. तर आदर्श नाशिकमध्ये कामानिमित्त आला होता.  आदर्श सध्या त्यांच्या मित्रासोबत नाशिकमध्ये राहत होता…

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790