नाशिक: स्कूल व्हॅनला आग, चालकाच्या प्रसंगावधानाने जीवितहानी टळली

नाशिक: स्कूल व्हॅनला आग, चालकाच्या प्रसंगावधानाने जीवितहानी टळली

नाशिक (प्रतिनिधी): म्हसरूळ येथे काकासाहेब देवधर कॉलेज परिसरात शालेय वाहतूक करणाऱ्या चालू व्हॅनला आग लागल्याची घटना घडली.

सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नसून आगीचे कारण कळू शकलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास घडली असून या गाडीमध्ये पाच विद्यार्थी त्यावेळी होते असे समजते.

हे ही वाचा:  नाशिक शहरातील 'या' वाहतूक मार्गात ९ नोव्हेंबरपर्यंत महत्वाचा बदल !

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”9815,9822,9824″]

तर या गाडी चालकाच्या प्रसंगावधानाने सर्व विद्यार्थी सुखरूप असून कुणालाही इजा झालेली नाही. तसेच अग्निशनम दलाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही आग विझवण्यात आली.

म्हसरूळ हद्दीत काकासाहेब देवधर कॉलेज समोर स्कूल व्हँन क्रमांक एम एच 15 जी व्ही7667 ही व्हॅन पाच मुलं आणि एक महिला घेऊन जात असताना अचानक गाडीत फायर अलार्म वाजू लागला. गाडी चालकाने गाडी बाजूला घेऊन गाडीची तपासणी केली त्यात गाडीतील पुढील भागातून अचानक धूर येऊ लागल्याने चालक अशोक संपत नवले यांनी तात्काळ गाडी मध्ये असलेल्या पाच मुले व एक महिला यांना तात्काळ खाली उतरवले. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. सदर ठिकाणी फायर ब्रिगेड च्या गाडीने येऊन आग विझवली आहे स्कूल व्हँनचे जळून नुकसान झाले आहे

हे ही वाचा:  नाशिक: स्टॉक ट्रेडिंगच्या बहाण्याने दाम्पत्याने केली दोन लाखांची फसवणूक

दरम्यान ही आग विझविण्यासाठी एक बंब पाठविण्यात आला होता. तर आग विझविण्यासाठी पंचवटी अग्निशमन दलाचे एस. जे. कानडे, पी. व्ही. काकडे, डी. पी. पाटील, पिंपळे, गायकवाड, हेमंत कुलकर्णी यांनी प्रयत्न केले. तसेच नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790