नाशिक(प्रतिनिधी): लॉकडाऊन मध्ये शिथिलता मिळाल्यापासून नाशिक शहरातील गुन्हेगारीत प्रचंड वाढ झाली आहे.. त्याचाच आढावा..
ओळखीचा फायदा घेत युवकास बेदम मारहाण
सातपूर परीसातातील श्रमिक नगर येथे दि(२४ मे २०२०) रोजी विकास उर्फ सुरेश निकम (२९,रा. श्रमिक नगर,सातपूर) या युवकास, शैलेश जाधव, दादू उनवणे, व अमोल देऊळकर या तीन संशयितांनी ओळखीचा फायदा घेऊन, कुरापत काढून शिवीगाळ करत मारहाण केली. या संदर्भात सातपूर पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदविण्यात आली आहे.
संशयितांनी सुरेश निकम यास ओळखीचा फायदा घेत, बोलायचे म्हणून श्रमिक नगर येथील कडलक गिरणी जवळ बोलावले आणि शैलेश जाधव याने तू तुझा मित्रांमध्ये मला शिवीगाळ का करतो असे विचारले. सुरेश निकम याने गैरसमज करू नको असे सांगितले असता, दादू उनवणे व अमोल देऊळकर यांनी सुरेश निकम यास शिवीगाळ करत मारहाण केली. व शैलेश जाधव’ याने लाकडी दांड्याने सुरेश निकम याच्या डोक्याच्या मागच्या बाजूस मारून दुखापत केली. या प्रकरणाचा तपास पो. हवालदार शिंदे करत आहे
जीवे मारण्याची धमकी देत युवकावर चाकूने हल्ला
वडाळा गाव येथे दि .( २५ मे २०२० ) रोजी सलमान रफिक कुरेशी (२१ ,रा. वडाळागाव ) यास रस्त्यावर उभे असताना संशियीत काळ्या आणि गोलड्या या दोघांनी कुरापत काढून शिवीगाळ करत मारहाण करून, युवकाच्या उजव्या पायाच्या पंजावर चाकूने वार करत जीवे मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात इंदिरा नगर पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदविण्यात आली आहे.
सलमान कुरेशी हा युवक रस्त्यावर उभा असताना, तू आम्हाला बघून शिव्या का देतो अशी कुरापत काढून काळ्या आणि गोलड्या या संशियीतानी युवकास मारहाण करून, त्याच्या उजव्या पायच्या पंजावर चाकूने वार केले आणि युवकास जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार ९७८ भामरे करत आहे.
भगुर येथे घरफोडी ; सोने चांदी व रोख रक्कम लंपास
भगूर परिसरातील आठवडे बाजार, सरकारवाड्या जवळील शिवानी महेंद्र झिंगरे (२३,रा. सरकारवाडा जवळ भगुर) यांच्या राहत्या घरी,दि (१५ मे २०२०) रोजी ९ वाजेच्या सुमारास बंद घराची कडी उघडून, घरातील तिजोरीतील सोने चांदीचे दागिने व रोख रकमेची चोरी अज्ञाताने केली. ह्या प्रकरणाची तक्रार देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथे केली आहे.
शिवानी महेंद्र झिंगरे यांच्या घराला कडी लावलेली असताना ती उघडून घरात प्रवेश करून,सोने चांदीचे दागिने आणि रोख रकमेची चोरी अज्ञाताने केली. हा प्रकार उघडकीस येताच या प्रकरणाची तक्रार तक्रार देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथे केली असून या प्रकरणाचा तपास स.पो.उ.नि राठोड करत आहे.
चार जणांकडून युवकास राहत्या घरी शिवीगाळ करत युवकाच्या वडिलांना दगड मारून दुखापत
सिडको परिसरातील सावता नगर येथे, एका युवकास चार जणांकडून राहत्या घरी, शिवीगाळ करत पिडीताच्या वडिलांच्या डोक्यात दगड मारून दुखापत केल्याचा प्रकार दि (२५ मे २०२०) रोजी घडला.या प्रकरणी अंबड पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदविण्यात आली आहे.
धनंजय दत्तात्रय बागड ( ४५, रा. सावता नगर, सिडको) असे पिडीताचे नाव असून, संशयित मयुर उर्फ टिणू मोरे, शेलार, दुबे व एक अनोळखी इसम. यांनी धनंजय बागड यांच्या कडे सिगारेट व बॉटल ची मागणी केली. ती न दिल्याने राग मनात धरून धनंजय यांना जिवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केला. व धनंजय बागड याच्या वडिलांना डोक्यात दगड मारण्याचा प्रकार घडला.
मद्यपान करून युवकाने केली गंभीर दुखापत
सिडको परिसरातील पाटील नगर, शनीचौक येथे, जिजाबाई लक्षम पाटील (५०, रा. पाटील नगर, सिडको )यांचा मुलगा राकेश लक्षण पाटील याने मद्यपान करून जिजाबाई बाई यांचे भाऊ यांच्या डोक्यात कुकर घालून गंभीर दुखापत केली. तसेच जिजाबाई यांचा दुसरा मुलगा विक्रांत यांच्या हातावर चाकूने वार करून दुखापत केल्याचा प्रकार दि (२५ मे २०२० ) रोजी घडला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदविण्यात आली आहे.
राकेश लक्ष्मण पाटील याने मद्यपान करून घरात वाद घातला व जिजाबाई यांच्या घरात घुसून त्यांचे दोन्ही भाऊ किशोर सूर्यवंशी व बापू सुर्यवंशी यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच बापू सुर्यवंशी यांच्या डोक्यात कुकर मारून गंभीर दुखापत केली. दरम्यान, जिजाबाई यांचा मुलगा विक्रांत याच्या हातावर चाकुने वार करून दुखापत केली. या प्रकरणी पो. उ. नि म्हात्रे तपास करत आहे.