नाशिक शहरात सोमवारी (दि. ३ जानेवारी) कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ

नाशिक शहरात सोमवारी (दि. ३ जानेवारी) कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात सोमवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे.

सोमवारी नाशिक जिल्ह्यात एकूण २१६ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

यात नाशिक शहर: १५१, नाशिक ग्रामीण: ३६, मालेगाव: ००, जिल्हा बाह्य: २९ असा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यात सोमवारी एकूण २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दोन्ही रुग्ण हे नाशिक शहरातील आहेत. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८७५८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यात सोमवारी एकूण ७४ रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहरातील सहायक पोलीस आयुक्तांची खांदेपालट

कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”9602,9576,9598″]

⚡ हे ही वाचा:  नाशिक: जमीन हडपून खंडणीची मागणी; लोंढे पिता-पुत्रासह पाचजणांवर गुन्हा

जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी म्हंटलं आहे, “काल मुंबईत एकाच दिवसात 8063 नवीन कोविड रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 89% पूर्णपणे लक्षणे नसलेले आढळले आहेत. मुंबईत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या आता 30000+ आहे. नवीन रुग्णांपैकी 503 रूग्णालयात दाखल झाले आहेत.  56 रुग्णांना ऑक्सिजन बेडवर ठेवण्यात आले आहे. नव्या व्हेरीएंटचा प्रसार समजण्यासाठी हे चित्र बोलके आहे. सर्व नागरिकांना आवाहन आहे की, कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य असून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.लसीचे कवच प्राप्त करून घेणे अत्यावश्यक आहे. आता वेळ कमी आहे. कोविड महामारीच्या या नव्या लाटेवर मात करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे अतिशय आवश्यक आहे.”

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here