सप्तशृंगी गड परिसरातील जंगलात आढळला तरूणाचा मृतदेह: हत्या की आत्महत्या?
नाशिक (प्रतिनिधी): सप्तशृंगी गड परिसरातील जंगलात आज एका अज्ञात तरूणाचा मृतदेह आढळून आला आहे.
गावाच्या बाहेर असलेल्या डोंगराच्या मागील बाजूस साधारण 34 ते 35 वर्ष वय असलेला इसम मृतावस्थेत अवस्थेत आढळून आल्याची चर्चा गावात पसरली होती.
कळवण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन शहानिशा केली असता, सदर इसम साधारणपणे वय 34 ते 35 वयोगटातील आहे.
या मृतदेहाच्या तोंडावर जखमा तसेच मानेवर रुमाल बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याचप्रमाणे त्याचे दोन्ही हात मागील बाजूस रुमालाने बांधलेल्या अवस्थेत आढळल्याने पोलिसांनी सुद्धा घातपाताचा अंदाज वर्तविला आहे. या घटनेबाबत घातपाताच्या चर्चेला उधाण आले असून ही हत्या कि आत्महत्या असा प्रश्न उपस्थित होत आहे. सप्तशृंगी गड परिसरात अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान सदर घटनेची नोंद चे काम कळवण पोलीस करीत आहे.
महत्वाचे: नाशिक शहरातील या भागांत शनिवार (दि. २०) व रविवार (दि. २१) नोव्हेंबर पाणीपुरवठा नाही