Breaking News: नाशिकला तरुण पोलीस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या आडगाव येथील ग्रामीण पोलिस मुख्यालयातील तरुण पोलिस शिपायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे..
अक्षय आंधळे वय २६ असे आत्महत्या केलेल्या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.
अक्षय हे नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील रहिवासी होते. 2018 साली ते पोलीस दलात भर्ती झाले होते.
सध्या ते नाशिकच्या ग्रामीण मुख्यालयात कर्तव्य बजावत होते. गेल्याच वर्षीच त्यांचे लग्न झाले होते. त्यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या केली त्यावेळी त्यांच्या पत्नी ह्या दिवाळीच्या सुट्टीनिमित्त माहेरी गेल्या असल्याचे समजते आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नसून आडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर पोलीस दलात आत्महत्येबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: दोन दुचाकींच्या धडकेत महिला ठार
🛑 महत्वाची बातमी: नाशिक शहरातील या भागांत हे दोन दिवस पाणीपुरवठा नाही
नाशिक : उड्डाणपुलावर उभ्या कंटेनरला कारची धडक; एक ठार
नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. १४ नोव्हेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू