BREAKING: नाशिकच्या या भागात मानवी वस्तीत बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये घबराट

नाशिकच्या या भागात मानवी वस्तीत बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये घबराट

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील मानवी वस्तीत सध्या बिबट्यांचा वावर हा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अशीच एक घटना नाशिकरोड भागात समोर आली आहे. नाशिक जेल अधीक्षक बंगला गोरेवाडी रोड येथे बिबट्याचा वावर दिसून आल्याने एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये मोठं भीतीचे वातावरण पसरले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: 'सावाना'तर्फे आज 'स्वर सावाना'त संवादिनी, मोहनवीणा, तबला वादन

गोरे वाडी रेल्वे गेट ते भीम नगर परिसरामध्ये बिबट्या भक्ष्याच्या शोधात फिरत असताना दिसून आला, या वेळी हा बिबट्या येथील एका घराच्या आवारात शिरून बसला होता, त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली होती. या आधी देखील नाशिकरोडच्या भगूर, देवळाली ,यांसह मळे परिसरात बिबट्याचा वावर दिसून आला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: शेअर्स ट्रेडिंगचे आमिष दाखवून लिंक पाठवत ३९ लाखांना गंडा

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”8318,8316,8314″]

गोरेवाडी रोड येथे बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांनी त्वरित हा बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी केली असून वनविभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. असे असले तरी दुसरीकडे मात्र शहरातील अनेक मानवी वस्ती मध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या बिबट्यांच्या वावरमुळे ही देखील एक मोठी समस्या बनत चालली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790