नाशिक: एकतर्फी प्रेमातून युवतीवर डिझेल टाकण्याचा प्रयत्न

नाशिक: एकतर्फी प्रेमातून युवतीवर डिझेल टाकण्याचा प्रयत्न

नाशिक (प्रतिनिधी): एकतर्फी प्रेमातून युवतीला रस्त्यात अडवत तिला लग्नासाठी तगादा लावत मा’र’हा’ण करण्यात आली. तसेच सोबत आणलेल्या बाटलीतील डिझेल दोघांच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: रस्त्यात अडवून जबरी लूट करणाऱ्या दोघांना अटक !

युवतीने आरडाओरड केल्याने हा प्रकार लक्षात आला. युवतीच्या तक्रारीनुसार संशयित मयूर दिलीप आहेर (रा. चांदवड) याच्या विरोधात मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. काठे गल्ली येथील नागजी सिग्नल-मुंबईनाका सिग्नल रोडवर हा प्रकार घडला. काही नागरिकांनी हा प्रकार पोलिसांना कळवला असता वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी घटनास्थळी दाखल होत संशयिताला ताब्यात घेतले. युवतीला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. नाशिकमध्ये पोलीस जरी टवाळखोरांवर कारवाई करत असले तरीही त्यांचे उपद्रवमूल्य कमी झालेले नाही. त्यामुळे पोलिसांनी अशा गुन्हेगारांवर आपला जरब बसविणे गरजेचे आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: प्रकाश लोंढे टोळीवर अखेर मकोकाची कारवाई

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”8313,8314,8309″]

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790