सिडकोत टाेळक्याकडून युवकाचा दगडाने ठेचून खून
![](http://nashikcalling.com/wp-content/uploads/2021/07/wellcare3.png)
नाशिक (प्रतिनिधी): गणेश चौकात येथे बुधवारी (दि. २८) रात्री ८ वाजता टोळक्याच्या हल्ल्यात एक युवकाचा खून झाला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, देवळालीगाव येथील प्रसाद भालेराव हा मित्रांसमवेत सिडकाेतील गणेश चौकात एका हॉटेलमध्ये जेवण करण्यास अाला हाेता. हॉटेलात एका अनोळखी युवकाबराेबर वाद झाला. हॉटेलमालकाने वाद मिटवून दाेघांना बाहेर काढून दिले. मात्र, संशयित युवकाने मित्रांना बोलावून घेत प्रसादवर चाकूने वार केले. तसेच डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले. त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. अंबड पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा तपासणी रात्री सुरू केली. संशयित फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. घटनेची माहिती मिळताच प्रसादच्या नातेवाइकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गर्दी केली हाेती. प्रसाद हा सहा बहिणींचा एकुलता एक भाऊ होता.