नाशिककरांनो रविवारच्या (दि. 18 जुलै) लसीकरणाबाबत महत्वाची बातमी..!

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहराच्या लसीकरणाबाबत नाशिक महानगरपालिकेने महत्वाची माहिती दिली आहे. नाशिक महानगरपालिका,नाशिक सार्वजनिक आरोग्य विभाग रविवार दि :१८ जुलै २०२१ रोजी मनपा हद्दीतील लसीकरण बंद राहणार आहे. नागरिकांना सूचित करण्यात येते की उद्या दिनांक : १८ जुलै २०२१ रोजी सर्व लसीकरण केंद्रावर लसीकरण बंद राहणार असून कोणीही लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, याची नाशिककर नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावांतील 8 वी ते 12 वीच्या शाळा सूर होणार असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ‘चला मुलांनो, शाळेत चला’ या मोहिमेअंतर्गत राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील 335 कोरोनामुक्त गावांतील 8 वी ते 12 वीच्या शाळा सोमवार पासून सुरू होणार आहेत.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790