नाशिक(प्रतिनिधी): शासनाने दिलेल्या सूचनांप्रमाणे व त्या अधिसूचनेत समाविष्ट असलेल्या प्रतिबंधित व सुट असलेल्या बाबींमध्ये जिल्ह्याच्या स्तरावर कोणताही बदल करण्यात आलेला नाही. स्थानिक जिल्हा प्रशासनास दिलेल्या अधिकारानुसार नाशिक महानगरपालिका, देवळाली कन्टोनमेंट क्षेत्र, मालेगाव महानगरपालिका क्षेत्र उर्वरित मालेगाव तालुका, निफाड तालुका, चांदवड तालुका, सिन्नर तालुका, येवला तालुका, नांदगाव तालुका या क्षेत्रांमध्ये गेल्या 21 दिवसात रुग्ण आढळून आलेले असल्याने व एकंदरीत परिस्थितीचा सारासार विचार करून त्या क्षेत्रास रेड झोन असे घोषित करण्यात येत आहे.
रेड झोन मध्ये अनुज्ञेय असलेल्या बाबी शासनाकडून निर्गमित झालेल्या अधिसूचनेत उल्लेखित आहेत. उर्वरित संपूर्ण जिल्हा ऑरेंज झोनमध्ये असणार आहे व त्याठिकाणी मूळ अधिसूचनेत ऑरेंज झोन मध्ये अनुज्ञेय असलेल्या तसेच प्रतिबंधित असलेल्या बाबी लागू राहतील. हि माहिती आपणास अधिसुचने संदर्भात ढोबळ कल्पना यावी म्हणून दिली आहे तपशिलवार अधिसूचना आज रात्री उशिरा संकेतस्थळावर अपलोड करण्यात येईल. जिल्ह्यातील नागरिकांनी लॉक डाऊन चा काळात संयम पाळून ज्या तालुक्यांमध्ये एकही रुग्ण निर्माण होऊ दिला नाही, त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील जवळपास नऊ तालुके ऑरेंज झोन मध्ये समाविष्ट करता आले.
“उर्वरित तालुक्यांमधील रुग्ण देखील लवकरात लवकर बरे होऊन ते तालुके देखील शून्य रुग्णांवर लवकर येतील याची मला खात्री आहे” असे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी म्हंटले आहे..!