नाशिक (प्रतिनिधी): महापालिकेच्या सर्व फिवर क्लिनिकमध्ये अथवा प्रत्येक विभागीय कार्यालयांच्या ठिकाणी कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना भेडसावणाऱ्या म्युकरमायकोसिससह अन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर उपचाराकरिता पोस्ट कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची परिस्थिती कालंतराने बिघडत असून हृदयविकार, ब्रेन हॅमरेजसह म्युकर-मायकोसिससारख्या आजाराचा धो’का उद्भवत आहे.
गोरगरिबांना उपचार घेणे परवडत नसल्यामुळे त्यांच्यासाठी पोस्ट कोविड सेंटर्स सुरू करण्याचा निर्णय जाधव यांनी घेतला आहे. महापालिकेचे फिवर क्लिनिक अथवा विभागनिहाय प्रत्येकी एक असे पोस्ट कोविड सेंटर्स सुरू करण्याचे निर्देश वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागरगोजे यांना देण्यात आले आहेत. सदर केंद्रांमध्ये पोस्ट कोविड रुग्णांसाठी प्राथमिक माहिती दिली जाणार आहे. या ठिकाणी ज्यांना ऑक्सिजनची गरज असेल त्यांना काॅन्सन्ट्रेटरद्वारे ऑक्सिजन पुरवला जाणार आहे.