मोठ्या अधिकाऱ्यासह तिघांना ५० हजारांची लाच घेताना अटक

नाशिक (प्रतिनिधी): वन क्षेत्रातून जलवाहिनीसाठी चर खोदल्याने कारवाई न करण्यासाठी एक लाखाच्या लाचेची मागणी करत तडजोडीअंती ५० हजारांची लाच घेताना वणी वनपरिमंडळाचे अधिकारी अनिल चंद्रभान दळवी, वनरक्षक उस्मान गनी मलंग सय्यद आणि एक महिला सुरेखा अश्रुबा खजे यांना बुधवारी (दि. १९) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. तक्रारदारांची चिंचखेड गावात शेतजमीन आहे.

🔎 हे वाचलं का?:  जनगणना-2027: स्व- गणनेचा आज (दि. १५) शेवटचा दिवस

बाजूस असलेल्या वन क्षेत्रातून जलवाहिनीसाठी चर खोदली होती. पथकाचे निरीक्षक चंद्रसेन पालकर, संदीप साळुंके यांच्या पथकाने अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790