कपालेश्वर मंदिर तीन दिवसांसाठी भाविकांसाठी बंद

नाशिक (प्रतिनिधी): येत्या आठवड्यात महाशिवरात्री उत्सव असल्याने गंगाघाटावरील श्रीकपालेश्वर मंदिरात हजारो शिवभक्तांची मोठ्याप्रमाणात गर्दी होऊ शकते. सध्याचा कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पोलीस प्रशासनाने बुधवार (दि. १०) ते शुक्रवार (दि.१२) असे सलग तीन दिवस मंदिरात भाविकांना प्रवेशास मनाई केली आहे. गुरुवारी महाशिवरात्रीला मंदिरातील मोजक्या पुजारी, गुरव वर्गाच्या उपस्थितीत कोरोन नियम पालन करून विविध धार्मिक कार्यक्रम पार पडावे अशा सूचना पोलिसांनी लेखी स्वरुपात केल्या आहेत.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थासाठी साधुग्राम, मंडप व्यवस्थेचा आढावा; २०१५च्या कुंभमेळ्यातील अनुभवाचा नियोजनात उपयोग
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790