🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

रिक्षाचालकाकडून तरुणावर प्राणघातक हल्ला

नाशिक (प्रतिनिधी): दारु पिण्यास पैसे न दिल्याचा राग मनात धरत एका अ‍ॅपे रिक्षाचालकाने थेट तरूणावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना पेठरोड भागात घडल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी संशयीत हल्लेखोर आकाश कैलास जाधव रा. फुलेनगर याच्या विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  रेरा बंद व्हायला हवा, याने पीडितांऐवजी कर्जबुडव्या बिल्डरांना मदत : सुप्रीम कोर्ट

फिर्यादी दत्ता रंगनाथ गोसावी मंगळवारी (दि. २) दुपारी पेठरोड भागातील एका दुकानासमोर उभा असताना संशयित रिक्षाचालकाने त्यास गाठते गोसावी यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र जाधव याने पैसे देण्यास नकार देताच संशयित जाधव याने त्यास शिवीगाळ करीत (एमएच १५ यू ५६२९) या रिक्षातील पाठीमागे प्रवाशांचे बसण्याचे सीट उचकटून त्याखालून कोयत्यासारखे घातक हत्यार काढत त्याने गोसावी यांच्यावर वार केले. या हल्ल्यात गोसावी यांना गंभीर दुखापत झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790