नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील भोसला शाळेत कोरोनाचा शिरकाव झाला असून ६ विद्यार्थ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर उर्वरित 51 विद्यार्थ्यांचे तसेच कर्मचारी व शिक्षक यांचे कोरोना अहवाल रात्री उशिरापर्यंत प्राप्त होण्याची शक्यता आहे. दरम्यान आपल्या शाळेत काही विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्याबाबत शाळेने न कळविल्याने मनपाच्या वैद्यकीय विभागाने शाळेला नोटीस बजावली असल्याचेही समजते आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790