नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटलमधून दीड वर्षांचे बाळ पळविले; भामटा सीसीटीव्हीत कैद !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमधील सिव्हील हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आलेल्या एका आईची नजर चुकवत अज्ञात भामट्याने तिची दीड वर्षांची मुलगी पळवून नेल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.१३) घडली. हा प्रकार आणि पळवून नेणाऱ्या व्यक्तीचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: थंडीचा कडाका वाढला; पारा १२.४ अंशांपर्यंत घसरला

नाशिक शहरातील एक महिला आपल्या बहिणीसोबत दीड वर्ष वयाच्या मुलीला घेऊन सिव्हीलमध्ये नियमित तपासणीसाठी आली होती. यावेळी बाळाला बाहेरील बाकावर बसवून महिला तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेली होती. सदर महिलेच्या बहिणीचे लक्ष नसल्याची संधी साधत एका व्यक्तीने चपळाईने त्या मुलीला उचलून नेले. ही घटना लक्षात येताच महिलेने आरडाओरड केली.

हे ही वाचा:  बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी तर दहावीची २१ फेब्रुवारीपासून

मात्र, तोपर्यंत ही व्यक्ती निघून गेलेली होती. ही घटना घडली त्यावेळी सुरक्षारक्षक जेवणासाठी बसले होते. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सरकारवाडा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, हाती आलेल्या फुटेजवरुन तपास सुरू केला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790