महावितरणच्या कार्यालयाला भाजप पदाधिकाऱ्यांनी लावले टाळे

नाशिक (प्रतिनिधी): वीजबिल दरवाढी विरोधात भाजपने आक्रमक पावित्रा घेतला आहे. शुक्रवारी सकाळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शरणपूर रोड येथील महावितरणच्या कार्यालयात आंदोलन केले. यावेळी पदाधिकाऱ्यांना गेटवर अडवल्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण तयार झाले होते. यावेळी राज्यसरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या आणि त्यानंतर महावितरणच्या कार्यालयाला टाळे लावण्यात आले. वीजबिल दरवाढ कमी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Loading

हे ही वाचा:  नाशिक: 1 ,2 व 3 बीएचके या पारंपरिक फ्लॅट्ससोबतच ग्राहकांचा कल 4-5 बीएचके, स्टुडिओ अपार्टमेंटकडे...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790