नाशिक (प्रतिनिधी): एकीकडे शुक्रवारी सकाळी भाजपने वीज बिल दरवाढीविरोधात आंदोलन केलेले असतानाच दुसरीकडे शिवसेनेने वाढत्या डिझेल-पेट्रोल दरवाढी विरोधात धरणे आंदोलन केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्रसरकरच्या विरोधात घोषणाबाजी देत आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात नाशिक चे सर्व प्रमुख सेना पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.
सध्या पेट्रोल डीझेलच्या दरवाढीने सामान्य जनता चांगलीच त्रस्त झाली आहे.
पेट्रोल दर शंभरीच्या आसपास येऊन ठेपल्याने सामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे.वाढत्या पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात आता शिवसेना आक्रमक झाली आहे. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी शिवसेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले आहे. ह्या आंदोलनात सेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. सामान्य जनतेला वाढत्या पेट्रोल डिझेल च्या दरवाढीतून सुटका मिळून द्यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे.