नाशिक जिल्ह्यातील ४० परीक्षा केंद्रांवर २८ नोव्हेंबर रोजी नवोदय विद्यालय प्रवेश निवड चाचणी

नाशिक। दि. २५ नोव्हेंबर २०२६: भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत व नवोदय विद्यालय समिती, नवी दिल्ली यांच्या माध्यमातून संचालित खेडगाव येथील पीएमश्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२७-२८ साठी इयत्ता सहावीच्या प्रवेशाकरिता निवड चाचणी परीक्षा नाशिक जिल्ह्यातील ४० परीक्षा केंद्रांवर २८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी १.३० या वेळेत घेण्यात येणार आहे, परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांनी सकाळी १०.३० वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन खेडगाव पीएमश्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य यांनी केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 8 डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा २०२७ चे ऑनलाइन अर्ज भरलेल्या आवेदन पत्र www.navodaya.gov.in किंवा https://cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard या संकेतस्थळावरुन आवेदनपत्राचा रजिस्ट्रेशन क्रमांक हा लॉगीन आयडी व जन्मतारीख हा पासवर्ड वापरुन डाऊनलोड करुन घ्यावे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्रावरील परीक्षा केंद्राचा पत्ता, परीक्षेसंबंधी सूचना व आवश्यक माहिती काळजीपूर्वक वाचून त्यानुसार तयारी करावी अशी माहिती खेडगाव पीएमश्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य यांनी दिली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790