नाशिक: धमकी देत व्यावसायिक तरुणाला साडेपाच लाखांचा ऑनलाइन गंडा

नाशिक। दि. २० नोव्हेंबर २०२६: ऑनलाइन माध्यमातून संपर्क साधून धमकी आणि कारवाईची भीती दाखवत एका सायबर भामट्याने व्यावसायिक तरुणाला ५ लाख ४४ हजार ५०० रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: RTO कडून खाजगी प्रवासी बसेस व वाहनांची 20 नोव्हेंबरपर्यंत विशेष तपासणी मोहिम

२६ वर्षीय व्यावसायिकाने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १ वाजून ३७ मिनिटांच्या सुमारास ही फसवणूक झाली.

अज्ञात सायबर भामट्याने फिर्यादी यांच्याशी फोन अथवा ऑनलाइन माध्यमातून संपर्क साधला. त्यानंतर धमकी देत तसेच संभाव्य कारवाई आणि नुकसान होण्याची भीती दाखवून त्यांच्यावर मानसिक दबाव निर्माण केला. या दबावाचा गैरफायदा घेत आरोपीने वेगवेगळ्या आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून फिर्यादींकडून तब्बल ५ लाख ४४ हजार ५०० रुपये ऑनलाइन हस्तांतरित करून घेतले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चिमुकल्या स्पंदनची सामाजिक बांधिलकी; पिगी बँकेतील १,६०० रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला सुपूर्द

या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ (सी) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790