मतदार यादीचे 22 डिसेंबर रोजी अंतिम प्रकाशन
नाशिक। दि. २० नोव्हेंबर २०२६: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून मतदार यादीतील त्रुटी दूर करून पात्र मतदारांची नावे समाविष्ट करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. त्यानुषंगाने प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांना पुन्हा संधी देण्यात आली असून अशा मतदारांनी ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत गणना प्रपत्र भरून द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने दावे व हरकती निकाली काढण्यासाठी १५ डिसेंबर २०२६ हा सुधारीत कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यानंतर २२ डिसेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट नसलेले पात्र नागरिक, मतदार यादीत नाव आढळून न आलेले नागरिक, स्थलांतरित झालेले तसेच मतदार यादीतून वगळण्यात आलेले नागरिक यांनी आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे (BLO) गणना प्रपत्र भरून द्यावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, श्री. प्रसाद यांनी केले आहे.
![]()


