Amazon

नाशिक: ३० हजारांची लाच मागणारा पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

नाशिक। दि. ५ नोव्हेंबर : गुन्ह्याच्या तपासात मदत करण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असलेल्या घोटी पोलीस ठाण्यातील हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाईदरम्यान ताब्यात घेतले आहे. अंबादास गोवर्धने असे संबंधित हवालदाराचे नाव असून, त्यांच्याविरोधात घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळ्याचे अधिकृत संकेतस्थळ भाविकांसाठी खुले; नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या तयारीची माहिती एका क्लिकवर!

या प्रकरणातील तक्रारदाराचे काही नातेवाईक एका गुन्ह्यात आरोपी आहेत. त्यांच्याविरोधात घोटी पोलीस ठाण्यात यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात आरोपींना मदत करण्यासाठी हवालदार गोवर्धने यांनी सहा आरोपींकडून प्रत्येकी पाच हजार रुपये, याप्रमाणे एकूण ३० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; आरोपीला ३ वर्षांचा कारावास

या मागणीविरोधात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज सादर केला होता. त्यानुसार सापळा कारवाई पथकाच्या पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांनी तक्रारीची पडताळणी केली. यावेळी पंच आणि साक्षीदारांच्या उपस्थितीत संबंधित हवालदाराने लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले.

त्यानंतर एसीबीच्या पथकाने तत्काळ कारवाई करत हवालदार गोवर्धने यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी त्यांच्याविरोधात घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790