Amazon

नाशिककरांनो आज (दि. ३०) शहरातील वाहतूक मार्गांत महत्वाचे बदल; कामावर जाण्याआधी नक्की वाचा…

नाशिक। दि. ३० ऑक्टोबर २०२६: सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यापूर्वी शुक्रवारी (दि. ३०) धर्मध्वज मिरवणूक होत असून यासाठी प्रवेशबंद मार्ग निश्चित करण्यात आले आहे. शुक्रवारी ३० ऑक्टोबरला सकाळी ६ वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत निर्बंध लागू राहतील. उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर करण्यात येणार आहे. कारवाई

वाहनांसाठी हा मार्ग बंद:
तपोवन मैदान-आठवण लॉन्स टी कॉर्नर- तपोवन कॉसींग – पंचमुखी हनुमान मंदिर- काट्या मारुती चौक-देवी चौक (अमरधाम रोड)- गणेशवाडी-फुल बाजार- गाडगे महाराज पुल- दिल्ली दरवाजा नेहरू चौक धुमाळ पॉईंट- मेन रोड कारंजा-अहिल्याबाई होळकर पूल-मालेगाव स्टँड ते रामकुंड (मिरवणुकीतील वाहने वगळून) सर्वच वाहनांना या मार्गावर प्रवेश नसेल. याशिवाय अशोक स्तंभ ते रविवार कारंजा, रेडक्रॉस ते धुमाळ पॉईंट, मालेगाव स्टॅण्ड ते मखमलाबाद नाका, दिंडोरी नाका ते मालेगाव स्टॅण्ड या दरम्यानही वाहतुकीला बंदी असेल.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज (दि. ३०) नाशिकमध्ये भव्य नगरपरिक्रमा !

नगरप्रदक्षिणेचा मार्ग:
नगरप्रदक्षिणेचा मार्ग मोदी ग्राउंड, पंचमुखी हनुमान मंदिर, काट्या मारुती चौक, गणेशवाडी, गाडगे महाराज पूल, दहीपूल मेन रोड, रविवार कारंजा, चांदीचा गणपती, व्हिक्टोरिया पूल आणि मालेगाव स्टँडमार्गे रामकुंड असा असेल.

वाहनांसाठी पर्यायी मार्ग:
👉 दिंडोरी नाका-पेठ नाका सिग्नल- मखमलाबाद नाका-गोदा पार्क- गजभिये पेट्रोल पंप चोपडा लॉन्स-गंगापूर नाका-इत्यादी तसेच सीबीएस-मेहर सिग्नल अशोक स्तंभजुना गंगापूर नाका-गजेभिये पेट्रोल पंप ड्रीम कॅसल-फडोळ चौक. कृषी सिग्नल तारवाला सिग्नल अमृतधाम चौक.
👉 पेठ नाका: कृषी उत्पादित सिग्नल तरवाला सिग्नल अमृतधाम चौक मिरची चौक सिग्नल.
👉 दिंडोरी चौकी: तारवाला सिग्नल अमृतधाम चौक मिर्ची चौक

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: क्रोमियम उत्सर्जन करणाऱ्या कंपन्यांची महिनाभरात १०० टक्के तपासणी करण्याचे आदेश

द्वारकाकडून येणाऱ्या नागरिकांना बळी मंदिर व त्यापुढे जायचे आहे त्यांनी द्वारकेवरून वर उड्डाणपुलावरून जायचे आहे.

👉 कार्यक्रमांचे नियोजन पुढीलप्रमाणे:
सकाळी ८:१५ वाजता :
सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळा व नगरप्रदक्षिणा.
सकाळी ९:०० ते १२:३० : प्रायश्चित्त संकल्पपूर्वक तीर्थ पूजन, पंचार्घ्य प्रदान, प्रधान संकल्प, गणेश पूजनादी पंचांग विधान, ब्राह्मण वरण, प्रधान देवता स्थापन आणि नवग्रह रुद्र स्थापन.
दुपारी २:३० ते सायंकाळी ७:३०: स्नपन विधान, नवग्रह हवन, प्रतिष्ठापना हवन, धान्याधिवास, शय्याधिवास, सायं पूजन आणि श्री गोदावरी प्रार्थना.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790