Amazon

नाशिक: ‘अमृत’ तर्फे दुर्गोत्सव 2026 चे आयोजन

नाशिक। दि. १९ ऑक्टोबर २०२६: दिवाळीत घरोघरी बालमित्रांसह तरूण व जेष्ठ मंडळी दुर्गांच्या प्रतिकृती साकारत असतात. या निमित्ताने शासनाच्या वतीने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) ने 5 ते 25 नोव्हेंबर 2026 कालावधीत दुर्गोत्सव 2026 चे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील नागरिक, सामाजिक संस्था, विद्यार्थी, युवा वर्ग, सर्व अनुदानित शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन अमृत नाशिक विभागाचे विभागीय व्यवस्थापक मंगेश खाडीलकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: नोकरीच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा; ३८ सायबर गुन्ह्यांशी संबंधित संशयित बदलापुरातून अटकेत

दुर्गोत्सव साजरा करण्याबाबतची संहिता व वेळापत्रक https://amrutdurgotsav.com/ या संकेस्तळावर उपलब्ध असून दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गड/दुर्गाच्या प्रतिकृती तयार करण्याच्या पंरपरेला प्रोत्साहन देणे, दुर्ग संवर्धनाविषयी जनजागृती करणे हा या उपक्रमाचा हेतू आहे, असेही श्री. खाडीलकर यांनी कळविले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790