Amazon

नाशिक: कारची काच फोडून २० लाखांची रोकड लंपास; अवघ्या काही मिनिटांत चोरट्यांनी बॅग पळवली

नाशिक, दि. १९ ऑक्टोबर २०२६: चहा पिण्यासाठी कार रस्त्याच्या कडेला उभी करून गेलेल्या कंत्राटदाराच्या वाहनाची काच फोडून चोरट्यांनी २० लाख रुपयांची रोकड असलेली बॅग चोरून नेल्याची घटना नाशिकमध्ये घडली. राका गार्डनच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर, सेंट्रल बँकेजवळ शनिवारी (दि. १७ ऑक्टोबर) दुपारी साडेचारच्या सुमारास ही चोरी झाली. याप्रकरणी अंबादास पोपट घुगे (५४, रा. जेलरोड) यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  सप्तशृंगी गडाजवळ झालेल्या अपघातात नाशिक ग्रामीण पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षकाचे निधन

मिळालेल्या माहितीनुसार, कामासाठी आवश्यक असलेली २० लाख रुपयांची रोकड घुगे यांनी त्यांचे मित्र पटेल यांच्याकडून पंचवटीतील इंद्रकुंड परिसरातून घेतली होती. त्यानंतर ते मित्र रमेश कटाळे आणि मनोहर ढोकणे यांच्यासोबत कारने राका कॉलनी परिसरात आले. दुपारी सुमारे ४.१५ ते ४.२० वाजण्याच्या दरम्यान त्यांनी राका गार्डनच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सेंट्रल बँकेजवळ रस्त्याच्या कडेला कार उभी केली. तिघेही जवळच्या चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी गेले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आरोग्य तपासणीत त्वचारोगाचे सर्वाधिक रुग्ण; दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर

दरम्यान कारमध्ये रोकड असल्याची संधी साधून दोन अनोळखी चोरट्यांनी वाहनाच्या डाव्या बाजूच्या मधल्या दरवाजाची काच फोडली. त्यानंतर दरवाजा उघडून आत ठेवलेली २० लाख रुपयांची रोकड असलेली बॅग घेऊन ते पसार झाले. चहा पिऊन परतल्यानंतर कारची काच फुटलेली आणि रोकड असलेली बॅग गायब असल्याचे घुगे यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. (सरकारवाडा पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: २८७/२०२६)

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याआधी नाशिकमध्ये दोन विश्वविक्रमांचे नियोजन !

चोरीस गेलेल्या बॅगेत ५०० रुपयांच्या ३ हजार ५०० नोटा आणि १०० रुपयांच्या २ हजार ५०० नोटा असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक जाधव पुढील तपास करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790