Amazon

नाशिक: आरोग्य तपासणीत त्वचारोगाचे सर्वाधिक रुग्ण; दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर

नाशिक। दि. १९ ऑक्टोबर २०२६ : अंबड आणि सिडको परिसरातील अस्वच्छ व दूषित पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. दत्तनगर परिसरात दूषित पाण्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले. या शिबिरात २०२ नागरिकांची तपासणी करण्यात आली असता, त्यापैकी १०६ जणांना त्वचारोग असल्याचे आढळून आले. त्यामुळे परिसरातील आरोग्यविषयक समस्यांकडे लक्ष वेधले गेले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कारची काच फोडून २० लाखांची रोकड लंपास; अवघ्या काही मिनिटांत चोरट्यांनी बॅग पळवली

दत्तनगर येथील तुळजाभवानी मंदिरात आयोजित या शिबिरात महिला, पुरुष आणि बालकांची तपासणी करण्यात आली. त्वचारोगाचे रुग्ण सर्वाधिक आढळल्याने दूषित पाण्याच्या समस्येबाबत चिंता व्यक्त होत आहे. मात्र, त्वचारोगाचे नेमके कारण दूषित पाणीच आहे का, हे निश्चित करण्यासाठी वैद्यकीय तपासणी आणि संबंधित पाण्याची गुणवत्ता तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये राज्यातील पहिले ‘अन्नपूर्ती धान्य एटीएम’ सुरू; आता २४ तास मिळणार धान्य!

या शिबिरात ६१ महिला, ३१ पुरुष आणि १४ बालकांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे. यापूर्वीच्या आरोग्य शिबिरात उपचार घेतलेल्या काही रुग्णांनीही पुन्हा तपासणी करून घेतली.

दरम्यान, आमदार सीमा हिरे, महापालिकेच्या आरोग्य सभापती डॉ. पूनम महाले, उपसभापती सतीश निकम, प्रियंका दोंदे, किरण दराडे, नितीन दातीर आणि किरण राजवाडे यांनी शिबिराला भेट दिली. त्यांनी परिसरातील आरोग्यविषयक परिस्थितीचा आढावा घेतला. दूषित पाण्याच्या प्रश्नावर प्रभावी उपाययोजना करण्याची गरज या निमित्ताने अधोरेखित झाली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790