नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप अकाउंट; सतर्कतेचे आवाहन…

नाशिक। दि. १५ सप्टेंबर २०२६: नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी आयुष प्रसाद यांच्या नावाचा, पदाचा आणि छायाचित्राचा गैरवापर करून अज्ञात व्यक्तीने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट तयार केल्याचे निदर्शनास आले आहे. या बनावट अकाउंटवरून नागरिकांना संदेश पाठवून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या अकाउंटवर ‘Ayush Prasad’ असे नाव व जिल्हाधिकारी, नाशिक यांचे छायाचित्र वापरण्यात आले आहे. तसेच +66 92 455 6074 या थायलंड देशाच्या क्रमांकाचा वापर करण्यात आला असून, ‘Business account’ म्हणून हे अकाउंट दर्शविण्यात येत आहे. संबंधित क्रमांकावरून “Hello… How are you doing… Where are you at the moment?” अशा स्वरूपाचे संदेश पाठविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 'डिजिटल अरेस्ट'चा धाक दाखवत वृद्धेला १५ लाखांचा गंडा; मनी लॉन्ड्रिंगच्या नावाखाली फसवणूक

या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी सदर क्रमांकावरून येणाऱ्या कोणत्याही संदेशाला, फोनला अथवा अन्य स्वरूपातील संपर्काला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या क्रमांकावर कोणतीही वैयक्तिक माहिती, कागदपत्रे, ओटीपी, बँक खात्याची माहिती अथवा आर्थिक व्यवहाराशी संबंधित माहिती देऊ नये.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक पकडली; १२.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या नावाने तयार करण्यात आलेले हे अकाउंट अधिकृत नसून, नागरिकांनी त्याची नोंद घेऊन सावधगिरी बाळगावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

नागरिकांनी जिल्हाधिकारी अथवा जिल्हा प्रशासनाच्या नावाने सोशल मीडिया किंवा मेसेजिंग ॲपवरून प्राप्त होणाऱ्या संशयास्पद संदेशांची खातरजमा केल्याशिवाय कोणतीही कार्यवाही करू नये. संशयास्पद संपर्क आढळल्यास संबंधित यंत्रणेला त्याची माहिती द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790