नाशिक: एसटी बस नियोजनात उद्यापासून (दि. ११) महत्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर…

नाशिक। दि. १० सप्टेंबर २०२६: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) नाशिक विभागातील बसस्थानकांमधून सुटणाऱ्या बसेसच्या नियोजनात शुक्रवार (दि. ११) पासून फेरबदल होणार आहे. निमाणी बस स्थानकातून सुटणाऱ्या काही बसेस आता नवीन मेळा तसेच ठक्कर बसस्थानकातून सुटतील.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

मेळा बसस्थानक : मालेगाव, धुळे, जळगाव, चोपडा, शिरपूर, शहादा, चाळीसगाव, शिंदखेडा, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, मनमाड, नांदगाव, लासलगाव, येवला आदी.

नवीन बसस्थानक (ठक्कर): सटाणा, साक्री, नंदुरबार, नवापूर, पेठ, सुरगाणा, कळवण, सप्तशृंगी गड, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, गिरणारे, हरसूल, ओझरखेड आदी

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंगी गडाचा घाटरस्ता काँक्रिटीकरणासाठी १० सप्टेंबरपासून १७ दिवस बंद

महामार्ग बसस्थानक : शिर्डी, मुंबई मार्गावरील सर्व फेऱ्या, अहिल्यानगर मार्गावरील फेऱ्या तसेच वापी, वलसाड, सुरत.

दरम्यान, नाशिकरोड येथील एसटी बसस्थानकाचे सिमेंट काँक्रीटचे काम केले जाणार आहे. या बसस्थानकाचे कामकाज नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ स्वा. सावरकर उड्डाणपुलाखालील जागेतून सुरू रोईल. पुणे, शिर्डी, अहिल्यानगर, सांगली, तुळजापूर, भोर, नेवासा कोल्हापूर बस येथून सुटतील.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790