नाशिक: ५० ई-बस नाशिककरांच्या सेवेत दाखल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

नाशिक। दि. २९ ऑगस्ट २०२६: नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक, पर्यावरणपूरक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पीएम ई-बस सेवा योजनेंतर्गत ५० ई-बसेसचे नाशिककरांच्या सेवेत दाखल होत आहेत. या बसेसच्या माध्यमातून नागरिकांना विश्वासार्ह व दर्जेदार प्रवासाची सुविधा मिळणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

🔎 हे वाचलं का?:  राज्यातील पर्यटकांच्या शोधासाठी नेपाळमधील सरकारच्या संपर्कात- आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

नाशिक शहरासाठी दाखल झालेल्या ५० ई-बसेसचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी पालकमंत्री गिरीष महाजन, महानगरपालिकेच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, केंद्र शासनाच्या पीएम ई-बस सेवा योजनेंतर्गत नाशिक शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या ५० ई-बसेस शहरात दाखल झाल्या आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आधुनिक ई-बसेसचा समावेश झाल्यामुळे नागरिकांना विश्वासार्ह व दर्जेदार प्रवासाची सुविधा मिळणार आहे. तसेच सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढल्यास खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होऊन शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासही हातभार लागणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव पिकअपने दुचाकीला उडवले; २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

डिझेल बसेसच्या तुलनेत ई-बसेसच्या वापरामुळे परिचालन खर्चातही बचत होणार आहे. नाशिक शहराचा विकास आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी भविष्यात आणखी बसेस उपलब्ध होणार असून त्यातून नागरिकांना अधिक व्यापक आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790