नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन !

नाशिक। दि.१७ ऑगस्ट २०२६: गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या रायगड आणि नाशिक पालकमंत्रिपदाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांची नावं आज शासनाकडून जाहीर करण्यात आली आली आहेत. नाशिकमध्ये गिरीश महाजन तर रायगडमध्ये भरत गोगावले यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  त्र्यंबकेश्वरला जाणार असाल तर हे आधी वाचा… खासगी वाहनांना प्रवेशबंदी, वाहतुकीत मोठे बदल

महायुतीमधील तीनही पक्षांचे स्थानिक नेते आपापल्या जिल्ह्यांत आपले वर्चस्व राहावे आणि निधीचे नियंत्रण मिळावे यासाठी आक्रमक होते. यामुळे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्त्यांवर स्थगिती देण्यात आली होती. मात्र आज अखेर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा प्रश्न सुटला आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात रस्सीखेच सुरू होती.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा 'या' दिवशी बंद राहणार

रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले दोघेही इच्छुक होते. मात्र अखेर ही जबाबदारी भरत गोगावले यांच्याकडे सोपवण्यात आली. तर नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात चुरस होती. परंतु अखेर नाशिकची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे कायम ठेवण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मृद व जलसंवर्धनासाठी ‘रील फॉर साईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेत युवकांनी सहभाग घेण्याचे आवाहन

दरम्यान, नुकतेच भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त 15 ऑगस्ट 2026 रोजी नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय व शासकीय ठिकाणी मुख्य ध्वजारोहण करण्यात आले होते. तर रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790