Amazon

नाशिक: किडनॅपिंग तसेच खंडणीच्या गुन्ह्यातील 9 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद

नाशिक। दि. १० ऑगस्ट २०२६: जबरी चोरी आणि किडनॅपिंग, खंडणीच्या गुन्ह्यात ९ वर्षापासून पोलिसांना चकवा देणाऱ्या सराईताला अटक करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने श्रमिकनगर सातपूर येथे ही कारवाई केली. संभाजी विलास कवळे (रा. गणेश कॉलनी सातपूर) असे या संशयिताचे नाव आहे.

🔎 हे वाचलं का?:  मेडिलिव्ह हॉस्पिटल, नाशिक आणि अपोलो हॉस्पिटल, नवी मुंबई यांच्या संयुक्त यकृत प्रत्यारोपण उपक्रमामुळे उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना मिळाले नवे जीवन !

सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या पथकाने श्रमिकनगर परिसरात सापळा रचला. संशयिताला ताब्यात घेतले. संशयिताला पुढील तपासासाठी सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्या विरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात २ गुन्हे दाखल आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790