नाशिक: सोमवारी (दि. १०) विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन

नाशिक। दि. ८ ऑगस्ट २०२६: येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवार, दिनांक १० ऑगस्ट, २०२६ रोजी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विभागीय महसूल अपर आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिली आहे.

नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालय येथे सकाळी ११ वाजता होणाऱ्या विभागीय लोकशाही दिन कार्यक्रम विभागातील सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात दाखल झालेल्या प्रकरणांबाबत तक्रारदार समाधानी नसतील तर तेच या लोकशाही दिनामध्ये अर्ज दाखल करु शकतात. तक्रारदारांनी या लोकशाही दिनासाठी येताना जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या लोकशाही दिनामध्ये त्यांना देण्यात आलेल्या उत्तराची लेखी प्रत सोबत आणणे आवश्यक आहे.

🔎 हे वाचलं का?:  कुंभमेळ्याच्या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; विभागांनी जबाबदारीने काम करा - मुख्यमंत्री

दरम्यान, याच वेळेस विभागीय महिला लोकशाही दिनाचेही आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेद्वारे सोडवणूक करण्यासाठी या दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी ज्या समस्याग्रस्त व पीडित महिलांनी तालुकास्तर व जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिनात अर्ज केलेले असतील व त्यांच्या समस्येचे उत्तर मिळाले नसेल, त्यांनी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे टोकन नंबरसह त्यांचे अर्ज दिनांक १० ऑगस्ट रोजी विभागीय महिला लोकशाही दिनात सकाळी ११ वाजता सादर करावेत, असे आवाहन महिला व बालविकास विभाग, नाशिकचे विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790