
नाशिक। दि. २९ जुलै २०२६: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (CWG) पुरुष गटाच्या उंच उडी प्रकारात २.२८ मीटरची नेत्रदीपक उडी मारून ऐतिहासिक रौप्यपदक पटकावणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील सर्वेश कुशारे यांचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी आयुष प्रसाद यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, देवगावसारख्या ग्रामीण भागातील शेतातून सुरू झालेला सर्वेशचा प्रवास आज आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर यशस्वी ठरला आहे. त्यांची जिद्द, अथक मेहनत आणि सातत्य हे केवळ नाशिक जिल्ह्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे.
सर्वेश कुशारे यांनी आपल्या कामगिरीने नाशिक जिल्ह्याचा तसेच संपूर्ण देशाचा गौरव वाढविला असून, त्यांच्या या यशाबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले आहे. आगामी ऑलिम्पिक स्पर्धांमध्येही ते देशासाठी उल्लेखनीय कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त करत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
![]()


