Amazon

नाशिक: राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे ओझर विमानतळ येथे आगमन व स्वागत

नाशिक। दि. २८ जुलै २०२६: राज्याचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आज सकाळी खास विमानाने ओझर विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी प्रशासानाच्या वतीने विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांनी त्यांचे स्वागत केले.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थासाठी १३६ ठिकाणी आरोग्य सुविधा: पर्वणीला १९० रुग्णवाहिका सज्ज, ३,६०० अतिरिक्त मनुष्यबळ तैनात होणार

यावेळी राज्यपाल महोदय यांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, पोलीस आयुक्त डाॅ. संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी डॉ.जयकुमार आढे, उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरूळे, सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी संदीप आहेर, महाराष्ट्रआरोग्य विज्ञान विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. विठ्ठल धडके, डॉ. मिलिंद आवारे, तहसीलदार विशाल नाईकवाडे आदी उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790