Amazon

नाशिक: अटक टाळून मदतीसाठी ४ लाखांच्या लाचेची मागणी; पोलिस उपनिरीक्षकासह तिघांना अटक

नाशिक। दि. २८ जुलै २०२६ : गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी तसेच अटक टाळून मदत करण्याच्या मोबदल्यात चार लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) तत्कालीन पोलिस उपनिरीक्षकासह तिघांविरुद्ध कारवाई करत त्यांना अटक केली आहे.

या प्रकरणात तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक हर्षवर्धन दिलीप बहीर (सध्या श्रीरामपूर शहर पोलिस ठाणे, जि. अहिल्यानगर) यांच्यासह सुनील शिवाजी बोराडे आणि जगदीश तुकाराम बोराडे (दोघेही रा. पाटोदा, ता. येवला) यांना अटक करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  मेडिलिव्ह हॉस्पिटल, नाशिक आणि अपोलो हॉस्पिटल, नवी मुंबई यांच्या संयुक्त यकृत प्रत्यारोपण उपक्रमामुळे उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना मिळाले नवे जीवन !

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, पाटोदा येथील एका गुन्ह्यात संबंधित व्यक्तीला आरोपी न करण्यासाठी व अटक होऊ नये यासाठी मदत करण्याच्या बदल्यात बहीर यांनी खासगी मध्यस्थामार्फत चार लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीने पडताळणी केली असता लाचेच्या मागणीची पुष्टी झाल्याचे तपासात निष्पन्न झाले.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थासाठी १३६ ठिकाणी आरोग्य सुविधा: पर्वणीला १९० रुग्णवाहिका सज्ज, ३,६०० अतिरिक्त मनुष्यबळ तैनात होणार

या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीच्या नाशिक विभागातील अधिकारी पूनम केदार, गणेश निंबाळकर, नितीन नेटारे आणि सुरेश चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे.

फोन-पेवर ५० हजारांची लाच स्वीकारल्याचा आरोप

तपासादरम्यान आरोपींनी लाचेच्या रकमेत तडजोड करून २ लाख ५० हजार रुपये स्वीकारण्यास तयारी दर्शविल्याचे समोर आले. तसेच या व्यवहारातील ५० हजार रुपये ९ एप्रिल रोजी फोन-पे (PhonePe) द्वारे स्वीकारण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी शहराच्या 'या' विविध मार्गातील वाहतुकीत शुक्रवारी (दि. २५) महत्वाचे बदल...

एसीबीच्या माहितीनुसार, खासगी मध्यस्थाच्या माध्यमातून फोन-पेवर लाच स्वीकारल्याची उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याविरुद्धची ही नाशिक जिल्ह्यातील पहिली नोंद झालेली कारवाई असल्याचे सांगण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790