नाशिक शहरातील ‘या’ भागांत गुरुवारी (दि. १६ जुलै) वीजपुरवठा बंद राहणार…

नाशिक। दि. १५ जुलै २०२६: नाशिक शहरामधील सिडको उपविभाग अंतर्गत दत्त चौक या उपकेंद्रातून निघणाऱ्या त्रिमूर्ती या ११केव्ही विद्युत वाहिनीवर देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने गुरुवारी दि. १६ जुलै रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत या वाहिनीवरील वीजपुरवठा बंद राहणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता नाही; अनेक जिल्ह्यांत पावसाची प्रतीक्षा कायम

यामध्ये मोती चौक, महाकाली चौक, खांडे मळा, राधाकृष्ण मंदिर चौक, हनुमान चौक, महालक्ष्मी मंदिर चौक,श्री इछामणी चौक, पाटील नगर, त्रिमूर्ती चौक, पेठे हायस्कूल, हेडगेवार चौक, सरस्वती चौक, सेवादास नगर, अजिंक्य विला व परिसर याचा समावेश असेल.

देखभाल व दुरुस्तीचे काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास वा वेळ लागल्यास त्यानुसार वीज पुरवठा सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग १ कडून करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790