Amazon

नाशिक डाक विभागामध्ये विमा एजंटांची थेट भरती

नाशिक। दि. १५ जून २०२६: नाशिक डाक विभागात टपाल जीवन विमा तसेच ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेसाठी थेट मुलाखतीद्वारे अभिकर्त्यांची (Direct Agent) नेमणूक करण्यात येत आहे. त्यासाठी नाशिक डाक विभागातील इच्छुक उमेदवारांनी मंगळवार ७ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता वरीष्ठ डाक अधीक्षक, नाशिक विभाग यांच्या कार्यालयात आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह व तीन पासपोर्ट फोटो, पॅन कार्ड, आधार कार्ड सहीत मुलाखतीला स्वखर्चाने उपस्थित राहावे, असे आवाहन वरीष्ठ डाक घर अधीक्षक प्रफुल्ल वाणी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  मेडिलिव्ह हॉस्पिटल, नाशिक आणि अपोलो हॉस्पिटल, नवी मुंबई यांच्या संयुक्त यकृत प्रत्यारोपण उपक्रमामुळे उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना मिळाले नवे जीवन !

पात्रता व अटी अशा :
👉 उमेदवार इयत्ता १० वी अथवा समतुल्य परीक्षा (केंद्र अथवा राज्य सरकार मान्यताप्राप्त) उत्तीर्ण असावा.
👉 उमेदवाराचे वय कमीत कमी १८ वर्षे पूर्ण असावे.
👉 संगणकाचे आणि स्थानिक ठिकाणांचे ज्ञान असावे.
👉 सध्या कोणत्याही आयुर्विमा कंपनीचा एजंट नसावा.
👉 उत्तीर्ण उमेदवारास रु. ५०००/- (रुपये पाच हजार मात्र) चे राष्ट्रीय बचत पत्र (NSC)
“सिक्युरिटी डिपॉझिट” स्वरूपात भरणे बंधनकारक राहील.
👉 प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपाचा परवाना देण्यात येईल. नंतर आवश्यक ती परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर उमेदवाराचा परवाना कायम करण्यात येईल, तो ५ वर्षांसाठी वैध राहील.
👉 उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, परस्पर संवाद, कौशल्य, जीवन विमा बाबत ज्ञान या आधारावर केली जाईल.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थासाठी १३६ ठिकाणी आरोग्य सुविधा: पर्वणीला १९० रुग्णवाहिका सज्ज, ३,६०० अतिरिक्त मनुष्यबळ तैनात होणार

बेरोजगार/स्वयंरोजगारीत तरुण, निवृत्त सैनिक, पूर्वी विमा प्रतिनिधी म्हणून काम केलेल्या व्यक्ती, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ सदस्य, निवृत्त शिक्षक, बचत गट प्रतिनिधी आणि वरील अटी पूर्ण करणाऱ्या इच्छुक व्यक्तींची नेमणूक मुलाखतीद्वारे करण्यात येईल. अधिक माहीतीसाठी वरीष्ठ डाक अधीक्षक, नाशिक विभाग यांचे कार्यालय तसेच जवळच्या कोणत्याही डाक कार्यालयात इच्छुकांनी संपर्क साधावा.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790