दहावीच्या १६.१५ लाख विद्यार्थ्यांचा आज निकाल

मुंबई/नाशिक। दि. ८ मे २०२६: राज्यातील दहावीच्या सुमारे १६ लाख १५ हजार विद्यार्थ्यांचा निकाल शुक्रवारी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. उत्तरपत्रिका पडताळणीसाठी ९ मे ते २३ मे दरम्यान विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार असल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये दुचाकी-मोबाइल चोरीचा गुन्हा उघड; विधिसंघर्षित बालक ताब्यात

ज्या विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकन करायचे आहे त्यांनी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक आहे. त्यानंतर पाच दिवसांच्या आत पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची पडताळणी करता येणार आहे. हा निकाल डिजिलॉकर खात्यातही पाहता येणार आहे. तसेच मंडळाच्या आणि एसएससी – एमकेसीएलच्या वेबसाइटवर निकाल पाहता येईल.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' भागांत बुधवारी (दि. ९) वीजपुरवठा बंद राहणार...

विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देऊन उत्तीर्ण व्हायचे आहे किंवा गुण सुधारायचे आहेत, अशांना जून-जुलै २०२६, फेब्रुवारी-मार्च २०२७ तसेच जून-जुलै २०२७ सत्रांमध्ये श्रेणी सुधार योजनेंतर्गत पुन्हा परीक्षा देता येणार आहे. त्यासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790