नाशिक: जनगणना 2027 स्वगणनेत नागरिकांनी सहभाग नोंदवावा -जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

नाशिक। दि. २७ एप्रिल २०२६: केंद्र सरकार तर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘जनगणना 2027’ या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्यात व्यापक तयारी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांना स्वगणना (Self-Enumeration) प्रक्रियेत योग्य माहिती देवून सहभाग नोंदवावा,असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

जनगणना ही देशाच्या विकासाचा पाया असून, या अचूक आकडेवारीच्या आधारे शासन विविध लोककल्याणकारी योजना तयार करून राबविते. यंदा प्रथमच डिजिटल माध्यमातून जनगणना करण्यात येत आहे. नागरिकांना तंत्रज्ञानाचा उपयोग करून स्वतःहून माहिती नोंदविता येणार आहे. स्वगणना प्रक्रिया १ ते १५ मे २०२६ या कालावधीत https://se.census.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे. नागरिकांनी या पोर्टलवर जाऊन आपल्या कुटुंबाची अचूक व संपूर्ण माहिती भरावी. हे पोर्टल मराठी, हिंदी, इंग्रजीसह इतर १३ प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असून सर्वसामान्यांसाठी सुलभ करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  जिल्ह्यात दोन महत्वाच्या सर्वेक्षणांचा शुभारंभ; रोजगार, बेरोजगारी व असंघटित क्षेत्राची अचूक माहिती होणार संकलित

तसेच, जे नागरिक स्वगणना करू शकणार नाहीत, त्यांच्यासाठी २३ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान प्रगणक व पर्यवेक्षक घरोघरी जाऊन माहिती संकलित करणार आहेत. यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रगणक आणि पर्यवेक्षक (Enumerators and Supervisors) यांचे प्रशिक्षण २३ एप्रिल ते ०८ मे २०२६ या कालावधीत तालुका स्तरावर (Field Trainers) सुरू करण्यात आले आहे.या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी आवश्यक ती अचूक माहिती देऊन सहकार्य करावयाचे आहे.

🔎 हे वाचलं का?:  राज्यात २० जूननंतर मान्सूनची परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता

‘जनगणना २०२७’ यशस्वी करण्यासाठी या उपक्रमात लोकप्रतिनिधी, अधिकारी व समाजातील सर्व घटकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करताना जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790