Breaking

नाशिक शहरातील रस्त्यांच्या कामांमुळे २५ सिटीलिंक बसफेऱ्यांच्या मार्गात बदल

नाशिक। दि. १ एप्रिल २०२६: आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या रस्त्यांची कामे व त्यामुळे परिणामी होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता पोलिस प्रशासनाने दिलेल्या निर्देशान्वये सिटीलिंकच्या काही बसफेऱ्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत.

सिंहस्थ कुंभमेळयामुळे प्रशासनाला कामे वेळेत पूर्ण करण्याची डेडलाईन असली तरी जोपर्यंत कामे पूर्ण होणार नाही तोपर्यंत बसेस अन्य पर्यायी मार्गाने सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: दुचाकी वाहनांसाठी MH15-KX नवीन मालिका सुरू; 'चॉईस नंबर'साठी असा करा अर्ज…

बदल करण्यात आलेले मार्ग क्रमांक व मार्ग पुढीलप्रमाणे:
मार्ग क्रमांक :
२०१, २०२, २०३, २०७, २०८, २१०, २११, २३१, २३६, २४३, २४२, २४७, २५१, २६०, २६३, २६४, २६६, २९८, १२९, १३०, १४६, १४८, १६६ वरील २३ मार्गावरील बसेस नाशिकरोड येथून सुटल्यानंतर आंबेडकर नगर, विजय ममता सिग्नल, अशोका मार्ग, भारतनगर, साईनाथ नगर, इंदिरा नगर जॉगिंग ट्रॅक, इंदिरानगर बोगदा, महामार्ग, मुंबई नाका, उर्दू शाळा गंजमाळ, शालीमार मार्गे आपल्या नियोजित मार्गाने मार्गस्थ होतील व पुन्हा येतानादेखील याच मार्गाचा वापर करतील.

🔎 हे वाचलं का?:  राज्यात हवामान अस्थिर; नाशिक-जळगावसह अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, गारपीटीची शक्यता

मार्ग क्रमांक : २५९, १०४ या दोन मार्गावरील बसेस सुरुवातीस नियोजित मार्गे पुढे पाथर्डी गाव, टाकळीकडे जाताना उर्दू शाळा, आयेशा नगर, नागजी मार्गे जातील व पुढे पुन्हा आपल्या नियोजित मार्गाने मार्गस्थ होतील तसेच त्याच मार्गाने पुन्हा येतील. सदर मार्गातील बदल हे पोलिसांने दिलेल्या निर्देशानुसार केले असून सदर बदल पुढील निर्देश प्राप्त होईपर्यंत कायम असतील. प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी माहिती घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन सिटीलिंक प्रशासनाने केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790