नाशिक: युवकावर धारदार शस्त्राने हल्ला; तिघांविरोधात गुन्हा

नाशिक। दि. ३० मार्च २०२६ : शहरातील अमरधाम परिसरात एका युवकावर तीन अनोळखी व्यक्तींनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली असून यात युवक गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तुमच्या दुकानात बालकामगार काम करतोय? होऊ शकते कठोर कारवाई !

पोलिसांच्या माहितीनुसार, हिरामण गणेश गाढवे (वय २५, रा. भारतनगर, मुंबई नाका) हे शनिवारी (दि. २८) मध्यरात्री सुमारे १२:४० वाजता भाजी मार्केटहून घरी परतत असताना अमरधाम पुलाजवळ थांबले होते. यावेळी तीन अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आल्या. व त्यांनी विचारले, ‘तू कुठे राहतो?’. संशय आल्याने गाढवे तेथून निघण्याचा प्रयत्न करत असतानाच एका सडपातळ आरोपीने त्यांच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार केला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये पुढील ३ ते ५ दिवसांत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता

या हल्ल्यात गाढवे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेदरम्यान परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आरडाओरड होताच तिन्ही आरोपी मोटारसायकलीवरून घटनास्थळावरून पसार झाले.

जखमी युवकावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू असून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790