नाशिक: अफवांमुळे पेट्रोल पंपांवर गर्दी; इंधनटंचाई नसल्याचा कंपन्यांचा खुलासा

नवी दिल्ली/नाशिक, दि. २६ मार्च २०२६: युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेलचा साठा संपणार असल्याच्या अफवांनी देशभरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बुधवारी अनेक राज्यांतील पेट्रोल पंपांवर मोठ्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. काही ठिकाणी साठा तात्पुरता संपल्याने किरकोळ वादही झाल्याची नोंद आहे.

🔎 हे वाचलं का?:  रेल्वे तिकीटांच्या नियमांत महत्वाचे बदल; एप्रिलपासून होणार लागू… जाणून घ्या सविस्तर…

दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी या अफवांचे खंडन करत इंधनाचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले आहे. Indian Oil Corporation, Bharat Petroleum आणि Hindustan Petroleum यांनी स्वतंत्र निवेदनांद्वारे नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि ‘पॅनिक बायिंग’ टाळण्याचे आवाहन केले आहे.

सोशल मीडियावर बुधवारी (दि. २५) सायंकाळपासून इंधनटंचाईच्या बातम्या वेगाने पसरल्यानंतर अनेक ठिकाणी नागरिकांनी पेट्रोल पंपांकडे धाव घेतली. नाशिक शहरातही बहुतांश पंपांवर रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. जिल्ह्यात पुरेसा इंधनसाठा उपलब्ध असून नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790