नाशिक: कौटुंबिक वादातून मुलाकडून वडिलांची हत्या

नाशिक। दि. १९ मार्च २०२६: क्षुल्लक कौटुंबिक वादातून मुलाने जन्मदात्याच्या पोटात चाकू खुपसून हत्या केल्याची घटना पंचवटीतील पेठरोड परिसरात घडली होती. पंचवटी पोलिसांनी आरोपी मुलाला बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोकडे चाळ, नवनाथनगर येथील रहिवासी सखाराम भावसार (६५) आणि त्यांचा मुलगा अश्विन सखाराम भावसार यांच्यात ५ फेब्रुवारीला दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कौटुंबिक वादातून शाब्दिक चकमक उडाली. रागाच्या भरात अश्विनने जवळ असलेल्या धारदार चाकूने वडिलांच्या पोटाच्या डाव्या बाजूला वार केला. त्यात सखाराम भावसार हे गंभीर जखमी झाले, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पंचवटी पोलिसांनी मुलगा अश्विन याला ताब्यात घेऊन खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790