नाशिक: महाशिवरात्रीनिमित्त कपालेश्वर मंदिर २४ तास खुले; व्हीआयपी दर्शन बंद

नाशिक, दि. १४ फेब्रुवारी २०२६: महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर रामकुंड परिसरातील कपालेश्वर महादेव मंदिर २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थानतर्फे घेण्यात आला आहे. भाविकांना अखंड आणि सुलभ दर्शन मिळावे, यासाठी ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील ४८ शेतकरी गटांना मिळणार ‘किसान ड्रोन’चा लाभ; ४ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान

रविवार, दि. १५ रोजी महाशिवरात्री असल्याने पहाटे मंदिरात विधिवत पूजा करण्यात येणार आहे. त्यानंतर गुरव व पुजारी वर्गाच्या हस्ते अभिषेक, पूजन व महाआरती पार पडेल. पहाटे चार वाजल्यापासून मंदिर दर्शनासाठी खुले केले जाणार आहे.

भाविकांच्या सोयीसाठी प्रवेश आणि निर्गमनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्य प्रवेशद्वारातून दर्शनासाठी सोडण्यात येईल, तर दर्शनानंतर उत्तर व दक्षिण दरवाजातून बाहेर पडण्याची सोय असेल. मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालण्यास मनाई करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

दरम्यान, गर्दीचा ताण कमी करण्यासाठी आणि सर्वसामान्य भाविकांना प्राधान्य देण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मंदिर परिसरात शिस्त राखण्यासाठी स्वयंसेवक व सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानने दिली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790