नाशिक। दि. ११ फेब्रुवारी २०२६: वाहन मालकांचे अद्ययावत संपर्क क्रमांक तपशील वाहन प्रणालीत उपलब्ध नसल्यामुळे पीयूसीसी, विमा, कर व दंड इत्यादी वाहनासंबंधीच्या महत्वाच्या सूचना वाहनधारकांपर्यंत पोहचविण्यास अडचणी येतात.
त्यामुळे पीयूसीसी सेवा देताना वाहनमालकाचा आधार प्रमाणीकरण केलेला मोबाईल क्रमांक शासनाने अनिवार्य केला असल्याने वाहन धारकांनी तो सेवा घेतांना उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नाशिक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
वाहन धारकांनी पीयूसीसी सेवा घेतांना आधार प्रमाणीकरण केलला मोबाईल उपलब्ध करून न दिल्यास त्यांना पीयूसीसी सेवा देण्यात येणार नाही, असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
![]()
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790

