महाशिवरात्री: १४ ते १६ फेब्रुवारीस त्र्यंबकमध्ये ‘व्हीआयपी’ दर्शन बंद

नाशिक। दि. ४ फेब्रुवारी २०२६: जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता १४ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सर्व प्रकारचे व्हीआयपी आणि प्रोटोकॉल दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कालबाह्य कागदपत्रांची विक्री

ट्रस्टच्या अध्यक्षा तथा जिल्हा न्यायाधीश श्रीमती पी. व्ही. घुले आणि सचिव राहुल सुभाषचंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला. ट्रस्टने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, महाशिवरात्रीच्या काळात ही गर्दी कैक पटीने वाढते. या गर्दीमुळे प्रशासनावर येणारा ताण आणि निर्माण होणाऱ्या अडचणी विचारात घेऊन, सर्वसामान्य भाविकांना सुलभरीत्या दर्शन मिळावे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790