नाशिक: बसमध्ये चढताना वृद्धेचे दीड लाखाचे मंगळसूत्र लांबवले

नाशिक। दि. ३ फेब्रुवारी २०२६: मेळा बसस्थानकातून बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत चोरांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना घडली.

याप्रकरणी विजया अशोक हिरे (७८, रा. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगाव येथे जाण्यासाठी त्या मेळा बसस्थानकात आल्या होत्या. यावेळी फलाटावर उभ्या असलेल्या नाशिक-शहादा एसटी बसमध्ये चढत असताना चोराने त्यांच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र लांबविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  गंगापूर धरण ९७% भरले; जायकवाडीकडे ९ टीएमसी पाण्याचा विसर्ग, गोदावरीच्या पुराचा ८ गावांना फटका
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790